Thursday 23 February 2017

अपयश ही यशाची पहिली पायरी

जी माणसे सातत्याने एखाद्या गोष्टीच्या मागे प्रयत्न करत राहतात. त्यांना यश मिळतेच. खूप माणसे आयुष्यात आपल्या मेहनतीवर यशस्वी होतात. पण ते सतत यशस्वी होत गेलेत असे नाही. त्यांनाही अपयशाचा सामना करावा लागला. जर तुम्ही आता सतत अयशस्वी होत असाल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण आता तुमचा प्रवास फक्त एकाच मार्गाने होणार आहे आणि तो म्हणजे यशाकडे जाणारा मार्ग हा सकारात्मक विचार सतत अपयश मिळणाऱ्या व्यक्तीच्या मनात प्रबळ इच्छाशक्ती निर्माण करू शकतो. अपयशाकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो आणि त्या अनुभवातून आपण काय शिकतो ते महत्वाचे आहे.

      एका व्यक्तीच्या तीस वर्षातील पराभवाकडे पहा. १८३१ साली ते व्यवसायात अपयशी ठरले. १८३२ साली निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. १८३३ साली ते व्यापारात पूर्णपणे तोट्यात गेले. १८३६ साली त्यांना नैराश्यातेचा झटका आला. १८३८ साली ते सभापती पदाची निवडणूक हरले. १८४० साली ते पुन्हा निवडणुकीत हरले. १८५६ साली ते उप राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरले. अशी त्यांची पराभवाची मालिका होती. पण १९६० साली ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांचे नाव होते अब्राहम लिंकन. आपल्यापैकी किती जणांनी इतके अपयश पचवले असते?

      असे म्हणतात की प्रत्येक अपयशानंतर एक संधी आपली वाट पाहत असते. त्यामुळे बहुतेकजणांच्या अपयशामध्ये यशाचे गुपित दडलेले असते. त्या अपयाशातूनच एखाद्या रचनात्मक कामाची सुरुवात होऊन त्यातून भाग्योदय होतो. अपयशानंतर चांगल्या वेळेची वाट पहा. वेळेच्या ताकदीवर विश्वास ठेवा. अपयशामुळे आलेले नैराश्य, दु: वेळेसोबत निघून जाते. आणि जेव्हा आपला वाईट काळ चालू असतो तर समजावे लवकरच आपली चांगली वेळ सुध्दा येणार आहे.


      अपयश आपल्याला आपल्या धेय्यापेक्षा वेगळा विचार करण्याची संधी देतो. त्यामुळे या काळात तुम्ही नवीन कल्पनांना वाव देऊ शकता. तुम्ही नवीन काही तरी शिकता. मनातील नकारात्मक भावना कमी होते आणि नवीन उत्साहाने तुम्ही काम करू लागता. अपयशानंतरच्या काळात आपलं दु: जवळच्या व्यक्तीला सांगा. त्यामुळे तुमचे मन हलके होते आणि दु: नाहीसे होते. अपयशाने कधीच खचून जाऊ नका. जर आपल्या मनात जिद्द असेल तर यशाचे मार्ग अमर्याद होत जातात

1 comment: