Wednesday, 8 March 2017

जागतिक महिला दिन

जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस हा ८ मार्च १९४३ साली साजरा झाला. १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले.

"प्रेमाचा अर्थ आहे एक दुसऱ्याचा सन्मान, समानता आणि स्वतंत्रता..."

प्रत्येक स्त्री मधल्या मातृत्वाला..तिच्या कतृत्वाला..स्ञित्वाला आमचा मानाचा सलाम 💐👏🙏

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐

शुभेच्छुक: मराठी शुभेच्छा टीम
https://play.google.com/store/apps/details?id=npsquare.marathi.shubheccha

Thursday, 23 February 2017

अपयश ही यशाची पहिली पायरी

जी माणसे सातत्याने एखाद्या गोष्टीच्या मागे प्रयत्न करत राहतात. त्यांना यश मिळतेच. खूप माणसे आयुष्यात आपल्या मेहनतीवर यशस्वी होतात. पण ते सतत यशस्वी होत गेलेत असे नाही. त्यांनाही अपयशाचा सामना करावा लागला. जर तुम्ही आता सतत अयशस्वी होत असाल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण आता तुमचा प्रवास फक्त एकाच मार्गाने होणार आहे आणि तो म्हणजे यशाकडे जाणारा मार्ग हा सकारात्मक विचार सतत अपयश मिळणाऱ्या व्यक्तीच्या मनात प्रबळ इच्छाशक्ती निर्माण करू शकतो. अपयशाकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो आणि त्या अनुभवातून आपण काय शिकतो ते महत्वाचे आहे.

      एका व्यक्तीच्या तीस वर्षातील पराभवाकडे पहा. १८३१ साली ते व्यवसायात अपयशी ठरले. १८३२ साली निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. १८३३ साली ते व्यापारात पूर्णपणे तोट्यात गेले. १८३६ साली त्यांना नैराश्यातेचा झटका आला. १८३८ साली ते सभापती पदाची निवडणूक हरले. १८४० साली ते पुन्हा निवडणुकीत हरले. १८५६ साली ते उप राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरले. अशी त्यांची पराभवाची मालिका होती. पण १९६० साली ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांचे नाव होते अब्राहम लिंकन. आपल्यापैकी किती जणांनी इतके अपयश पचवले असते?

      असे म्हणतात की प्रत्येक अपयशानंतर एक संधी आपली वाट पाहत असते. त्यामुळे बहुतेकजणांच्या अपयशामध्ये यशाचे गुपित दडलेले असते. त्या अपयाशातूनच एखाद्या रचनात्मक कामाची सुरुवात होऊन त्यातून भाग्योदय होतो. अपयशानंतर चांगल्या वेळेची वाट पहा. वेळेच्या ताकदीवर विश्वास ठेवा. अपयशामुळे आलेले नैराश्य, दु: वेळेसोबत निघून जाते. आणि जेव्हा आपला वाईट काळ चालू असतो तर समजावे लवकरच आपली चांगली वेळ सुध्दा येणार आहे.


      अपयश आपल्याला आपल्या धेय्यापेक्षा वेगळा विचार करण्याची संधी देतो. त्यामुळे या काळात तुम्ही नवीन कल्पनांना वाव देऊ शकता. तुम्ही नवीन काही तरी शिकता. मनातील नकारात्मक भावना कमी होते आणि नवीन उत्साहाने तुम्ही काम करू लागता. अपयशानंतरच्या काळात आपलं दु: जवळच्या व्यक्तीला सांगा. त्यामुळे तुमचे मन हलके होते आणि दु: नाहीसे होते. अपयशाने कधीच खचून जाऊ नका. जर आपल्या मनात जिद्द असेल तर यशाचे मार्ग अमर्याद होत जातात

Saturday, 18 February 2017

⛳महाराष्ट्राचे आराध्य दैवत⛳

🔊तमाम शिवभक्तांना 🔊 👉 ⛳महाराष्ट्राचे आराध्य दैवत⛳ 🐅छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या हार्दीक शुभेच्छा🐅 --------------

🚩जय शिवराय 🚩
🚩जय शंभूराय 🚩

Friday, 17 February 2017

" एकदम थोडक्यात - Open Source Software “

Open Source Software हे एक असे Software आहे जे सर्वांसाठी त्याचा संपूर्ण Source कोडसह सहज आणि अगदी मोफत उपलब्ध आहे. या Software च्या License मध्ये नमूद केलेल्या अटीनुसार हे Software.

) त्याच्या Source कोड सह कुणीही वापरू शकतो,
) त्याच्या Source कोड चा अभ्यास करून ते बदलू शकतो.
) त्याच्या Source कोड मध्ये बदल करून तयार झालेले नवीन Version कुणालाही वापरायला देऊ शकतो.

साधारणपणे Open Source Software हे सार्वजनिक पद्धतीने विकसित केले जाऊ शकते. Open Source Software तयार करण्यामागे महत्त्वाची अशी चार करणे खालील प्रमाणे आहेत :
) कमी खर्च
) सुरक्षा
) विक्रेता नाही म्हणजे विक्रेत्याकडून येणारे कोणत्याही प्रकारचा दबाव नाही.
) चांगला दर्जा

इंटरनेट उपलब्ध असलेल्या Open Source Software ची यादी जर इथे दिली तर ती खूपच मोठी होईल, तरीही आपण काही Software बद्दल नक्कीच जाणून घेऊ शकतो.

) GIMP : ग्राफिक्स एडिटिंग सॉफ्टवेअर
) Bitcoin : डीजीटल चलन
) WebERP : इंटरनेट वर आधारित ERP प्रणाली
) Mozilla Thunderbird : -मेल सॉफ्टवेअर
) Opera Mail : -मेल सॉफ्टवेअर
) VNC (RealVNC, TightVNC, UltraVNC - रिमोट एक्सेस आणि व्यवस्थापन
) Firefox - वेब ब्राउझर
) VLC - व्हिडीओ प्लेयर

  • काही Open Source ऑपरेटिंग Systems (OS) ची यादी :

) Linux
) Android
) Haiku
) FreeDos
) Open WebOS
) Ubuntu
) Start Os
) Edubuntu
) Kubuntu
१०) Chromiun
११) FirefoxOs



- युवा आयटी टीम